Ad will apear here
Next
‘सावनी अनप्लग्ड’ : नव्या-जुन्या गाण्यांची मैफल
पुणे : गोल्डन पिरॅमिड एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘सावनी अनप्लग्ड’ ही सुरेल गाण्यांची मैफल १६ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या सोलो मैफलींची सुरुवात पुण्यापासून होत आहे. संगीत संयोजनातील वेगळेपण प्रेक्षकांना या कार्यक्रमातून अनुभवता येईल. मैफलीत नवी व जुनी गाणी वेगळ्या ढंगात सादर करण्यात येणार आहेत. या अनप्लग्ड सीरिजची सुरुवात दोन वर्षांपूर्वी वेब सीरिजच्या माध्यमातून झाली. त्यातून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळेच या कार्यक्रमाची बांधणी करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाची संकल्पना गोल्डन पिरॅमिड एंटरटेन्मेंट व सावनी रवींद्र यांची असून यामध्ये हिंदी, तमीळ, मराठी, गझल, लोकगीते, सूफी गायनप्रकार सादर केले जातील. मैफलीत की बोर्डवर अनय गाडगीळ, तबला व झेंबेवर नितीन शिंदे, ड्रम्ससाठी अभिजित भदे, गिटारकरिता अमित गाडगीळ आणि संवादक म्हणून आरजे राहुल अशी तगडी साथसंगत असणार आहे.   

गोल्डन पिरॅमिड एंटरटेन्मेंटने यापूर्वी अनेक कार्यक्रम केले असून, पारंपरिक वाद्यांची साखळी मोडून जुनी गाणी नव्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात येत आहे.

दिनांक : १६ जून २०१७ 
वेळ : रात्री साडेनऊ 
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZJGBD
Similar Posts
‘सा’ व ‘नी’तर्फे संगीत महोत्सवाचे आयोजन पुणे : येथील ‘सा’ व ‘नी’ सूर संगीत व एनसीपीए यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘भवितव्य’ या खास उदयोन्मुख कलाकारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालयातील सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असेल.
‘ट्रिनिटी’मध्ये एहसान नुरानी यांचा ‘मास्टरक्लास’ पुणे : प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांनी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच ‘मास्टरक्लास’ घेतला. एहसान यांच्या साथीने विद्यार्थ्यांची पावले ‘तारे जमीन पर’, ‘कल हो ना हो’, ‘दिल चाहता है’, ‘जिंदा है तो’ या गाण्यांच्या तालावर थिरकली. आपल्या
पुण्यात चित्रप्रदर्शन व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन पुणे : चित्र आणि संगीत या दोन कलांचा मिलाफ साधून राधा आणि कृष्णाचे नाते पुन्हा एकदा नव्याने अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे पुण्यातील आविष्कार क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘मधुर सुरांतून चित्र बोलते...’ या अनोख्या चित्रप्रदर्शन आणि सांगीतिक कार्यक्रमाचे.
‘संगीत कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी करावा’ पुणे : ‘संगीत ही कला निसर्गानेच मानवाच्या हृदयात ठेवली आहे. या कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी कलावंतांनी आपल्या सूचना मांडाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा निश्चितच उपयोग करेल,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक एप्रिलला येथे केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language